• Total Visitor ( 84907 )

बीड आगारातील एस टी चालकाचा विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न

Raju Tapal November 08, 2021 35

मागील तीन दिवसांपासून बीड आगारात आंदोलन करणा-या एस टी कर्मचा-यांपैकी एका चालकाने विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.

रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बीड आगारातील मुख्य प्रवेशद्वारावर ही घटना घडली.

अमोल कोकटवाड वय -३५ रा.बीड असे विषारी द्रव्य प्राशन केलेल्या एस टी बस चालकाचे नाव असून या चालकाची प्रकृती गंभीर असून जिल्हा रूग्णालयातील आय सी यू विभागात दाखल करण्यात आले आहे.

अमोल कोकटवाड हे एस टी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपात मागील तीन दिवसांपासून सहभागी झाले. तीव्र आंदोलन करूनही शासन दखल घेत नसल्याने संताप व्यक्त करून रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी आंदोलनातून उठून  आगाराचे मुख्य प्रवेशद्वार गाठले. आपल्याकडे कोणीही पाहात नसल्याची संधी पाहात विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. आगारातून आलेल्या एका कर्मचा-याने पाहिल्याने  आरडाओरडा करून त्याच्या हातातील डब्याही फेकून दिल्या. विषारी द्रव्य प्राशन केलेल्या एस टी चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Share This

titwala-news

Advertisement