भाजप पक्ष हा उपऱ्याचा पक्ष आहे खासदार विनायक राऊत
मुरबाड शिवसेना संपर्क अभियान मेळावा नमस्कार हाॅल येथे आयोजित करण्यात आला होता.
मुरबाड मध्ये यावेळी भगवा झेंडा फडकला पाहीजे असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले कि मुरबाडकराना आमदार नीधी बघायला मिळत नाही 209 ते 2018परत मुरबाड मध्ये कोणतेही विकास कामे झाली नाहीत
सर्व नीधी बदलापूर मध्ये जातो.कल्याण मुरबाड रेल्वे अजून येत नाही.कल्याण मुरबाड परत रस्ता चारपदरी व्हायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.येथील आमदार हे फक्त खांद्यावर हात ठेवतात विकास मात्र काही करत नाहीत.भाजप हा उपऱ्याचा पक्ष आहे भाजप थापा मारणारा पक्ष आहे यामुळे आता मुरबाड मध्ये शिवसेनेचा आमदार निवडून द्या आपण यांना त्यांची जागा दाखवून देऊ यावेळी सेवा सोसायटी मध्ये निवडून आले त्यांचे सत्कार करण्यात आले
यावेळी शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील युवा सेना अधिकारी प्रभुदास नाईक उपाध्यक्ष सुभाष पवार तालुका प्रमुख कांतिलाल कंटे संघटक आप्पा घुडे धनाजी दळवी सर . राजेश भांगे शिवसेना नेते इत्यादी हजारों शिवसैनिक उपस्थित होते.