भरधाव कारने बाईकला दिलेल्या धडकेत कारचालक व बाईकस्वाराचा मृत्यू ; केज तालुक्यातील साळेगाव येथील कळंब रस्त्यावरची घटना
Raju Tapal
November 11, 2021
40
भरधाव कारने बाईकला दिलेल्या धडकेने कारचालक व बाईकस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील साळेगाव येथील कळंब रस्त्यावर घडली.
या अपघातात कारचालक अमित बाराते ,बाईकस्वार अमोल सत्वधर यांचा जागीच मृत्यू झाला.
बाईकवरील एक महिना व मुलगा हे दोघे जखमी झाले.
दिवाळी भाऊबीजेला अमित सत्वधर याची बहिण माहेरी आली होती. बस बंद असल्याने सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अमोल बहिणीला आणि भाच्याला तिच्या सासरी सोडण्यासाठी बाईकवरून घेवून जात होता. केज कळंब रस्त्यावर साळेगाव येथे शाम तेलंग यांच्या शेताजवळच्या पुलावर एम एच २५ ए एस ७५९० या क्रमांकाच्या भरधाव कारने अमोलच्या एम एच ४४ वाय २१५३ या क्रमांकाच्या बाईकला समोरून जोरदार धडक दिली. यानंतर कार पुढे जावून उलटली. या अपघातात अमोल सत्वधर आणि कार चालवत असलेला युवक अमित जीवन बाराते वय -२२ वर्षे रा.कळंब हे दोघे जागीच ठार झाले. बाईकवरील अनुराधा विनोद फुलसुंदर त्यांचा लहान मुलगा आदित्य हे दोघे जखमी झाले. जखमींवर अंबाजोगाई येथील सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, संतोष मिसळे, पाचपिंडे,गवळी, गायकवाड, शिनगारे,सानप, शेख ,गित्ते, हनुमंत गायकवाड हे सर्व पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.
Share This