भरधाव मालट्रकची दुचाकीला धडक ; पती पत्नी ठार
Raju Tapal
November 24, 2021
40
सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या मालट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती पत्नी जागीच ठार झाले.
अर्जून नामदेव थिटे वय - ६५ वर्षे , अनिता अर्जून थिटे वय - ६० वर्षे दोघेही रा.एस आर पी एफ कँम्प सोरेगाव ,सोलापूर अशी अपघातात ठार झालेल्या पती पत्नीची नावे असून हा अपघात २३ नोव्हेबरला दुपारी सव्वा एक वाजता कोळेगाव रेल्वे पुलाजवळ सोलापूर - पुणे महामार्गावर झाला.
कोंबडवाडी,अहमदनगर येथील सेवानिवृत्त एस आर पी एफ जवान २३ नोव्हेबरला कोंबडवाडी येथील.घरगुती कार्यक्रम उरकून पत्नी अनिता यांच्यासह दुचाकीवरून सोलापूरकडे निघाले होते.
दुपारी वेळे दरम्यान ते एम एच १३ ए के ७३३२ या दुचाकीवरून आले असता सोलापूरच्या दिशैने भरधाव वेगात निघालेल्या ए पी ३९ व्ही ६८२९ या क्रमांकाच्या मालट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने ट्रकचे चाक थिटे दाम्पत्याच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होवून दोघेही जागीच ठार झाले.
सचिन शंकर थिटे यांनी याबाबत मोहोळ पोलीसांत फिर्याद दिली असून मालट्रकचालक जी व्यंकटा सुरेन्द्रा जी बाबुराव रा.विजयवाडा ,आंध्रप्रदेश याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार विजयानंद माने अपघाताचा तपास करीत आहेत.
राज्य राखीव पोलीस दलामध्ये उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल अर्जून थिटे यांना २००७ मध्ये गौरविण्यात आले होते असे समजते.
Share This