भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा
Raju Tapal
February 15, 2022
91
भारतीय जनता पार्टीचे शिरूर तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा
भारतीय जनता पार्टीचे शिरूर तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी आपल्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
दादा पाटील फराटे मांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्षपदाचे कामकाज पाहिले आहे.तसेच रावसाहेबनगर ,न्हावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.
राजीनाम्याबाबत पत्रकारांशी बोलताना दादा पाटील फराटे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून सातत्याने माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून पक्षाचे काम निष्ठेने पार पाडत होतो. काम करीत असताना स्वार्थाची भुमिका कधीच ठेवली नाही गेली दोन वर्षे माझ्याकडे शिरूर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती .त्यानूसार सातत्याने शिरूर तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. सध्या माझ्या कौटुंबिक जबाबदारीमुळे मला पदासाठी वेळ देणे शक्य होत नाही. काम करायला पुरेसा वेळ मिळत नाही. या अडचणींमुळे मी पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपविला आहे असे दादा पाटील फराटे यांनी आपल्या भाजपाच्या तालुकाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले. यापुढील काळात कोणत्या पक्षात जायचे याचा अद्याप विचार केला नाही असेही फराटे यांनी सांगितले.
Share This