भातकुली तालुका स्विप कक्षाचा गटविकास अधिकार्यांच्या हस्ते सन्मान!
Raju tapal
December 11, 2024
12
भातकुली तालुका स्विप कक्षाचा गटविकास अधिकार्यांच्या हस्ते सन्मान!
मतदार जनजागृतीत उल्लेखनीय कार्य!
विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली
पं. स.भातकुली येथे स्वीप कार्यगौरव सोहळा संपन्न.
विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढल्याने मतदार जनजागृतीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ?दि.१० डिसेंबर २०२४ रोज सोमवारला स्वीप कार्यगौरव सोहळा पं. स.भातकुली येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरजी राऊत (भारतीय प्रशासन सेवा अधिकारी तथा गटविकास अधिकारी, पं. स.भातकुली) उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रविनजी वानखडे (सहा. गटविकास अधिकारी,पं. स.भातकुली),दिपकजी कोकतरे (नोडल अधिकारी, तथा गटशिक्षणाधिकारी, पं. स.भातकुली)नरेंद्रजी गायकवाड (अधिक्षक शालेय पोषण आहार, पं. स.भातकुली),संजयजी राठी (सहायक प्रशासन अधिकारी,पं. स.भातकुली),शकील अहमद (शिक्षण विस्तार अधिकारी, पं. स.भातकुली),पंजाबराव पवार (शिक्षण विस्तार अधिकारी, पं. स.भातकुली) उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली,या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवा या उद्देशाने पं. स.भातकुली येथे दिपकजी कोकतरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी म्हणून स्वीप कक्षाची स्थापना करण्यात आली होती.या स्वीप कक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून मतदान जनजागृती करण्यात आली,यामध्ये पिंक फोर्स, बाईक रॅली, मतदार मुलाखती,मतदान जनजागृती शपथ, विद्यार्थ्यांकडून पालकांना 'मतदान करा' असे आवाहन करणारे पत्र निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,पथनाटय अशा माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली.
या स्वीप टीम मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचारी बंधू भगिनींचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कार्यगौरव करण्यात आला यामध्ये कु.शितल राठोड, कु.एस. एस.उईके,सारिका सोळंके, सौ.नीता सोमवंशी,सुनील पांडे,जानराव सुलताने,किशोर रुपणारायन, रविंद्र धरमठोक,पंजाबराव पवार,राजेश सावरकर, लखन जाधव, सुजाता सोनवणे, मिनाक्षी खरटमोल,मेघा साबळे, रिता गुडधे, प्रज्ञा रामटेके,मंदा आंडे, शैलेंद्र स.दहातोंडे, जि.प.पूर्व माध्य मराठी शाळा, रामा,जि.प.पूर्व माध्य मराठी शाळा आसरा, जि.प.प्राथमिक कन्या शाळा पूर्णानगर,जि.प.प्राथमिक मराठी शाळा उत्तमसरा,आदर्श इंग्रजी प्रायमरी स्कूल भातकुली, धामोरी विद्यालय धामोरी यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपकजी कोकतरे (गटशिक्षणाधिकारी, पं. स.भातकुली )यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र स.दहातोंडे यांनी तर आभार प्रदर्शन मा.रवींद्र धरमठोक सर (केंद्रप्रमुख वाठोडा शु.)यांनी केले.असे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
Share This