• Total Visitor ( 84392 )

भोर तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Raju Tapal December 16, 2021 40

भोर तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर 

 

जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणा-या भोर तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

त्यासाठी प्रभाव रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सचिन पाटील यांनी पत्रकारांना दिली.

निवडणूक होणा-या प्रत्येक गावात १६ डिसेंबर २०२१ ते २ फेब्रुवारी २०२२ पर्यंत गावबैठका व ग्रामसभा घेवून आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.

प्रशासनाच्या वतीने गुगल अर्थच्या साहाय्याने नकाशे अंतिम केले जाणार असून  तलाठी व ग्रामसेवक यांनी स्थळपाहणी करून प्रभागाच्या सीमा निश्चित केल्या आहेत. ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण निश्चित केले आहे. तहसिलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी केली आहे.

निवडणुकीनंतर सरपंचपद निवडून आलेल्या सदस्यांमधूनच निवडले जाणार आहे.

निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायती याप्रमाणे :-

भावखेल, हरिश्चंद्री, कासुर्डी गुमा, आपटी, आंबेघर, ब्राह्मणघर, बारे खुर्द, बसरापूर, भुतोंडे, दुर्गाडी, डेहण, गुहिणी, गुढे, हर्णस, कुरूंगवडी, कोळवडी, कांबरे खे.बा.,करंदी खे.बा , कुंबळे, करंदी खुर्द, करंदी बुद्रूक, कोर्ली, कारी, कार्नावड, करंजगाव, खडकी, मळे, म्हाक़ोशी, म्हसर खुर्द, निगुडघर, पारवडी, पसुरे, पांगारी, राजघर, रावडी, सोनवडी, सांगवी बुद्रूक, सांगवी भिडे, सांगवी निधान, सांगवी हिमा, शिरवली तर्फे भोर, तेलवडी, विरवाडी, वेळवंड, वागजवाडी, वाठारहिंगे, वाठारहिमा, वाढाणे, येवली, अंगसुळे, भांबवडे, हातनोशी, साळुंगण, म्हसर बुद्रूक, भोलावडे व किवल.

प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत  जिल्हाधिका-यांच्या मान्यतेसाठी  सादर करणे १६ डिसेंबर , सदर प्रभाग रचना व आरक्षणाची तपासणी व दुरूस्ती करून मान्यता देणे २१ डिसेंबर , दुरूस्त्यांना समितीच्या सदस्यांनी सह्या करून मान्यता देणे २४ डिसेंबर, आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभेची सुचना देणे, २७ डिसेंबर , आरक्षण सोडत काढणे ३१ डिसेंबर, प्रारूप प्रभाव रचनेला प्रसिद्धी देऊन हरकती आणि सुचना मागविणे ३ जानेवारी २०२२,प्रभाग रचनेवर हरकती सादर करणे १० जानेवारी २०२२, हरकती व सुचना प्राताधिका-यांकडे  सुनावणीसाठी सादर करणे १२ जानेवारी २०२२, सुनावणी घेणे १९ जानेवारी, हरकती व सुचना सुनावणीनंतर प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे सादर करणे २४ जानेवारी २०२२ जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना आरक्षणाला अंतिम मान्यता देणे २८ जानेवारी , प्रभाग रचनेला प्रसिद्धी देणे २ फेब्रुवारी २०२२ .

Share This

titwala-news

Advertisement