सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी मोठा निर्णय;
राज्य निवडणूक आयोगाने 35 जागांवरील निवडणुका केल्या रद्द,कारण...मात्र,जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत निवडणुकांबाबत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.आज राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. राज्यात या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात २४७ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत या निवडणुकांवर स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला. त्यामुळे या निवडणुकांचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र,जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत निवडणुकांबाबत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मात्र,याबाबतची सुनावणी कोर्टात होण्याअगोदरच राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला असून १२ जिल्ह्यांतील नगरपालिका आणि नगरपंचायतीतील ३५ जागांवरील निवडणुका पुढील आदेशापर्यंत निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघामारे यांनी माहिती दिली आहे. अमरावती,छत्रपती संभाजीनगर,चंद्रपूर,गोंदिया,जालना, लातूर,नांदेड,परभणी,पुणे,सोलापूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील ३५ जागांवरील मतदानाला स्थगिती देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना य निर्णयाची अधिकृत माहिती पाठवली आहे. ३५ जागांच्या निवडणुका अचानक का रद्द करण्यात आल्या याबाबत देखील माहिती समोर आली आहे.
छाननी दरम्यान संबंधित ३५ जागांवरील उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर २५ नोव्हेंबरपर्यंत निकाल लागणे गरजेचे होते. पण तसे न झाल्याने पुढील कार्यवाही ठप्प झाली आहे. परिणामी कायवाहा ठप्प झाला आहे. पारणामा उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटपच झाले नसल्याने मतदान अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जागांवरील २ डिसेंबर रोजी होणारे मतदान रद्द झाले आहे. प्रचार अंतिम टप्प्यात,रंगत वाढली २ डिसेंबर रोजी राज्यातील २४७नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, बैठकांचा सिलसिला,प्रचार सभा,मोर्चेबांधनी घट्ट केली जात आहे. मोठे नेते उमेदवारांच्या प्रचार सभेत स्वतः उतरवून भाषणबाजी करताना दिसत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रखडेल्या निवडणुकीत एक वेगळचं रंगत पाहायला मिळत आहे.