भातकुली तालुक्यातील सायत ग्रामपंचायतचा मोठा निर्णय
जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या,घरपट्टी व पाणी पट्टी माफ
अमरावती/भातकुली - आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा टिकली पाहीजे या करीता गावातील ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन शाळेत पहील्या वर्गात प्रवेश घेणार्या विद्यार्थांच्या पालकांना घरपट्टी कर व पाणीपट्टीकर माफ करण्याचा मोठा निर्णय अमरावती जिल्हातील भातकुली तालुक्यातील सायत ग्रामपंचायतने घेतला आहे.या निर्णयामुळे गावातील शासकीय शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत होणार असुन गावातील जिल्हा परिषद शाळा टिकण्यास मदत होणार आहे.
संध्दा जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या कमी होऊन काही शाळा शेवटची घटका मोजत आहे.गावातच प्राथमिक शिक्षण मिळावे या करीता प्रत्येक गावात प्राथमिक काही गावात माध्यमिक शाळा शासनाने शाळा सुरु केल्या पण खाजगीकर करण्या करीता खाजगी,विना अनुदानित शाळा,स्वयंशासीत शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु झाल्यामुळे शासकीय व अनुदानित शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आल्या.गाव करी ते राव नाही करी अश्या म्हणी प्रमाणे गावाने पुढाकार घेतला तर अशक्य होणारी गोष्ट शक्य होऊ शकते.शासकीय आणि अनुदानित शाळेत प्रशिक्षित शिक्षक असतात.तर खाजगी विना अनुदानित आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कमी शैक्षणिक पाञता असणारे शिक्षक नेमल्या जातात.त्यामुळे विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही उलट हजारो रुपये फी पण भरावी लागते.आणि वाहतुकीचा,शालेय साहीत्य,गणवेश आणि शाळेत राबविल्या जाणारे विविध उपक्रम या करीता पालकांना आर्थीक भरणा करावा लागतो.पण शासकीय शाळेत सर्व मोफत मिळते आणि प्रशिक्षित शिक्षक यांच्या कडून दर्जेदार शिक्षण दिल्या जाते.पण शासनाने शिक्षकाकडे अशैक्षणिक कामे दिल्यामुळे आणि विविध शिक्षणा वेतीरीक्त कामे दिल्यामुळे शासकीय शाळेची पटसंख्या कमी होत आहे.यामुळे गावातील शाळा शेवटच्या घटका मोजत आहे.म्हणुन सायत ग्रामपंचायत सारखा निर्णय प्रत्येक गावातील ग्रामपंचायने घेतल्यास गावातील विद्यार्थी गावातीलच शासकीय शाळेत शिकतील आणि या निर्णयामुळे शिक्षणक्षेत्रात मोठा बदल होईल आणि बेरोजगार डी.एड् व बी.एड् या नोकरी उपलब्ध होईल असे अनेक फायदे अश्या निर्णयामुळे होतील.भातकुली पंचायत समिती मधिल सायत ग्रामपंचायच्या सरपंच अन्नपुर्णा ज्ञा. मानकर,उपसरपंच विशाल सु. भट्टड,सचिव विनय ना. ठोंबरे तसेच ग्राम पंचायचे सर्व सदस्य यांनी सर्व सायत ग्रामस्थांना विनंती केली कि, जे ग्रामस्थ आपल्या पाल्यांना ( मुलांना / मुलीना) गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतील त्यांना त्यांचे नावावरील मिळकतीची (घराची) घरपट्टी व पाणीपट्टीचा कर पूर्ण माफ राहील याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी अशा आदर्श निर्णय घेतला आहे.या निर्णयाचा फायदा गावातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढण्यास मदत होणार आहे.या आदर्श निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले असुन इतर ग्राम पंचायतने सुध्दा अश्या प्रकारचे निर्णय घ्यावे आणि शासकीय शाळा वाचव्यात अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे
आज दि . 24 - 06- 2025 ला ग्राम पंचायत सायत पं. समिती भातकुली जि. परिषद अमरावती आज झालेल्या मासिक सभेत ग्रामपंचायत सरपंच अन्नपुर्णा ज्ञा. मानकर ग्रामपंचायत अधिकारी विनय ठोंबरे आज झालेल्या सभेमध्ये जे ग्रामस्थ गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आपल्या मुला / मुलीचे प्रवेश घेतील अशा ग्रामस्थाना घरपट्टी कर व पाणी पट्टी कर पुर्ण माफ राहील . असा हा निर्णय ग्रामपंचायत सायत ने घेतला आहे. दिवसे दिवस बंद पडत चाललेल्या जिल्हा परिषद मराठी शाळा आणि मराठी शाळाचे अस्तिव कायम राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.