मुंबई-लातूर ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात मोठा खुलासा,
मुंबई पोलीस दलातील हवालदाराचा ड्रग्जचा कारखाना?
या प्रकरणात मुख्य आराेपी पाेलीस हवालदार,
राज्याच्या पाेलीस दलात उडाली खळबऴ,....
लातूर :- मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने लातूरमध्ये मोठी कारवाई केली आहे.ड्रग्ज विरोधात राज्यभरात कडक कारवाई केली जात आहे. ड्रग्जच्या आहारामुळे तरुणाईचं मोठं नुकसान होत आहे.त्यामुळे ड्रग्ज विरोधात कठोर कारवाई सुरु आहे.
राज्यभरात संशयास्पद ठिकाणी ड्रग्ज विरोधात छापेमारी केली जात आहे.या कारवाईत लाखो आणि कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा सापडत आहे.मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने लातूरमध्ये अशीच एक कारवाई केली.या कारवाईत तब्बल १७ कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे.तसेच ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे.विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलात हवालदार पदावर कार्यरत असणारा कर्मचारीच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा खुलासा या प्रकरणात करण्यात आलाय.
मुंबई-लातूर ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात मोठा खुलासा
लातूर जिल्ह्यातील रोहिना या गावात कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून ड्रग्स बनवण्याची कंपनी एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू करण्यात आली होती.मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चाकूर तालुक्यातील रोहिना शिवारात छापा मारून एका पत्राच्या झोपडीमधून अंमली पदार्थ बनवण्याचे आणि साठवण्याचे साहित्य जप्त केले.यावेळी घटनास्थळावरून ११.३६ किलोग्राम ड्रग्स जप्त करण्यात आले.त्याचे बाजार मूल्य १७ कोटी रुपयांचा जवळपास असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.या प्रकरणी एकूण सात आरोपींना मे. चाकूर न्यायालयाने १४दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यातील प्रमुख आरोपी मुंबई पोलीस कर्मचारी प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस येथे हवालदार म्हणून कार्यरत आहे. या कर्मचाऱ्याने आपल्या शेतामध्ये ड्रग्स बनवण्याची प्रक्रिया सुरू केली होती.संबंधित प्रकरणात एकूण सात जणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.प्रमोद केंद्रे हा मुंबई उपनगर येथील एका पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे.त्याचा संपर्क मुंबईतील इतर आरोपींसोबत आल्यानंतर गावाकडील शेताकडे ड्रग्स बनवण्याचे काम सुरू झाल्याचे त्याने मे.न्यायालयात सांगितले.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने शेतामध्ये रेड टाकून कच्च्या मालापासून बनवला जाणारा ड्रग्स हस्तगत केला आहे.सात आरोपींना १४ दिवसाची मे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.मुंबईच्या डी.आर.डी.आय. या संस्थेने लातूर जिल्ह्यातील रोहिना या गावात ड्रग्स बनवण्याच्या कंपनीवर धाड मारत सात आरोपींना अटक केले होते.यामधील पाच आरोपींना मे. न्यायालया समोर हजर केले आणि उर्वरित दोन आरोपींना आज मे.न्यायालया समोर हजर केल्यानंतर १४ दिवसांची मे. न्यायालयीन कोठडी मे.न्यायालयाने ठोठावली आहे.या प्रकारातून मुंबई-लातूर ड्रग्स कनेक्शन समोर आले आहे.