अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; कर्डे- न्हावरे रस्त्यावरील घटना
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील कर्डे - न्हावरे रस्त्यावर ८ जूनला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
बाळासाहेब रंगनाथ थोरात वय -५३ रा.निमोणे ता.शिरूर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून या अपघाता बाबत समजलेल्या माहितीनूसार बाळासाहेब थोरात हे त्यांच्या एम एच १२ एन एन ३६०२ या क्रमांकाच्या दुचाकीवरून कर्डे गावातील चौकातून न्हावरे रोडने घरी जात असताना समोरून येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.त्यांच्या डोक्याला, पायाला,छातीला गंभीर दुखापत झाल्याने बाळासाहेब थोरात यांचा अपघाती मृत्यू झाला.
शुभम बाळासाहेब थोरात वय-२८ या त्यांच्या मुलाने अपघाताची फिर्याद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दिली.
अज्ञात वाहनचालकाविरूद्ध शिरूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून या अपघाताबाबत कोणाला माहिती असल्यास शिरूर पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा असे आवाहन शिरूर पोलीसांनी कर्डे ग्रामस्थांना केले आहे.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे)