भाजप नेत्याची हत्या
Raju tapal
November 09, 2024
142
भाजप नेत्याची हत्या,
भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत संपवलं,
सांगली हादरली
सांगली :- मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भाजप नेते सुधाकर खाडे यांनी हत्या करण्यात आली आहे. सांगलीत त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करत त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत सांलीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथे मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आली आहे. पंढरपूर रोडवरील राम मंदिरजवळ त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. शेत जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून सुधाकर खाडे यांची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. सुधाकर खाडे यांच्यावर वार झाल्यानंतर त्यांनी जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतील त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
Share This