• Total Visitor ( 84380 )

भाजपचे मिशन लोकसभा २०२४; महाराष्ट्रातून अशी होणार सुरुवात

Raju Tapal January 02, 2023 74

भाजपचे मिशन लोकसभा २०२४;
महाराष्ट्रातून अशी होणार सुरुवात

नवी दिल्ली:-२०२३ या वर्षाला प्रारंभ होताच भारतीय जनता पक्षाने पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला प्रारंभ केला आहे.२०२३ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार आणि संघटना या दोघांचेही स्वरूप बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सोमवारी महाराष्ट्रात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या निवडणूकपूर्व प्रचाराची सुरुवात करणार आहेत. 'लोकसभा प्रवास योजने'अंतर्गत नड्डा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाला भेट देतील आणि पक्ष आणि जाहीर सभांची मालिका घेणार आहेत.

२०२४च्या लोकसभा निवडणुका एप्रिल-मेमध्ये होणार असल्या तरी भाजपने देशभरात तयारी सुरू केली आहे. निवडणूकपूर्व प्रचार सुरू करण्यासाठी नड्डा प्रत्येक राज्यात 'प्रवास' करणार आहेत. एकूण ५४५ लोकसभा मतदारसंघांपैकी, पक्षाने १६० मतदारसंघ निवडले आहेत. जेथे त्यांना कठीण लढा द्यावा लागेल. महाराष्ट्रात १४४ मतदारसंघ आहेत, त्यापैकी १८ भाजपसाठी अवघड आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रावसाहेब दानवे यांसारखे दिग्गज नेते नड्डा यांच्या एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर त्यांच्यासोबत असतील.

नड्डांचा कार्यकाळ संपतोय

यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, त्रिपुरा, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि जम्मू आणि काश्मीरसह १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळही याच महिन्यात संपत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही याच महिन्यात होणार आहे. त्यामुळे नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढविला जाण्याची अधिकृत घोषणाही जानेवारीतच होण्याची शक्यता आहे. नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढला तरी त्यांच्या संघात मोठा बदल होणार आहे आणि हा बदल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांपासून राज्य प्रभारी आणि सहकाऱ्यांपर्यंत नक्कीच होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Share This

titwala-news

Advertisement