• Total Visitor ( 369529 )
News photo

भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन 

Raju tapal October 17, 2025 72

भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन 

          

शिक्रापूर (प्रतिनिधी):- भारतीय जनता पक्षाचे राहुरी चे आमदार,अहिल्यानगर जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी  हृदयविकाराच्या झटक्याने  पहाटे निधन झाले.

आमदार कर्डिले यांना त्रास जाणवू लागल्याने पहाटे अहिल्या नगर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. नगर,नेवासा,राहुरी मतदार संघाचे विधानसभेचे प्रतिनिधित्व शिवाजीराव कर्डिले यांनी केले होते. ते सहाव्यांदा आमदार होते.

         


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement