शिक्रापूर येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
शिरूर :- स्वप्नपूर्ती फाऊंडेशनच्या सहकार्याने बालरंगभूमी परिषद पुणे यांनी शिक्रापूर ( ता.शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित केलेले मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर संपन्न झाले.
अॅड.नीलमताई शिर्के सामंत यांच्या प्रेरणेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
माहेर संस्थेच्या ल्युसी कुरियन यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.बालरंगभूमी पुणे शाखेच्या अध्यक्षा दिपालीताई शेळके, उपाध्यक्ष अरुण पटवर्धन, नारायणराव करपे, राजेंद्र बोधे,देवेंद्र भिडे, मुग्धा वडके,मंगेश चव्हाण, मंजुषा जोशी यावेळी उपस्थित होते.
डाॅ.प्रशांत पोफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश जगताप यांनी केले. यावेळी नटराज मूर्तीची पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली .माहेर संस्थेच्या
ल्युसी कुरियन यांनी शिबिराला यावेळी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्तव्य फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मनीषाताई गडदे. शिक्रापूरचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांनी परिश्रम घेतले.यावेळी फाऊंडेशनच्या सदस्या वंदना रामगुडे, मेघा तांबे,महेश शिर्के,अंकुश घारे, वैशाली गायकवाड, उदय ब्राह्मणे,राजाराम गायकवाड, मोहम्मदभाई तांबोळी, तांबे सर उपस्थित होते. यावेळी रक्तदात्यांना अल्पोपहार,प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला असे राजाराम गायकवाड यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालरंग भूमीच्या पुणे जिल्हा अध्यक्षा दिपालीताई शेळके यांनी केले.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )