केडीएमसीची टिटवाळ्यात धडाकेबाज कारवाई
राजू टपाल.
टिटवाळा :- १/अ प्रभागक्षेत्र कार्य कक्षेतील मांडा टिटवाळा विभागातील गणेश वाडी येथील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई मध्ये ५ पूर्ण अवस्थेत असलेल्या खोलींचे वीट बांधकाम आणि ८ जोत्यांची फाउंडेशन निष्काशीत केले. तसेच अनधिकृत पणे केलेल्या ९ नळ जोडण्या देखील खंडित करण्यात आलेल्या आहेत.
गेले ३ दिवस सतत अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई सुरू ठेवली आहे.
आयुक्त डॉकटर इंदुराणी जाखड यांचे आदेशान्वये, अतिरिक्त आयुक्त आणि मा. उप आयुक्त अबांनि. यांचे निर्देशानुसार व मार्गदर्शनाखाली, १/अ प्रभाग क्षेत्र कार्य कक्षेतील बल्याणी, ऊंभाणीं, मोहिली, मांडा टिटवाळा येथील बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
कारवाईसाठी ठेकेदाराचे पाच कामगार एक जेसीबी, अतिक्रम विभागाचे दहा कामगार एक वाहन, वरिष्ठ लिपिक, लिपिक उपस्थित होते व त्यांच्या सहाय्याने निष्कासन कारवाई करण्यात आली आहे.
आज कारवाई वेळेस पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाला नाही. अशी माहिती
प्रमोद पाटील
सहाय्यक आयुक्त, १/अ प्रभाग यांनी सांगितले.