नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील ग्रामपंचायतीच्या मशानभुमी मध्ये मृत व्यक्तीला अग्नि देण्याचे व सेवा करण्याचे कामासाठी ग्रामपंचायतीमार्फत शंकर कडमंचवर हे 25 ते 30 वर्षापासून काम करत असून कडमंचवर यांना बोलठाणं ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरूपी घेऊन पगार देण्यात यावा अशी मागणी शंकर कडमंचवर यांनी बोलताना केली.
बोलठाण येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या स्मशानभूमी मध्ये शंकर कडमंचवर हे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून काम करत असून, ते चार ते पाच व्यक्तींच्या कुटुंबासह राहतात. ग्रामपंचायतीनेत्यांना राहण्यासाठी छोटीशी खोली बांधून दिलेली आहे. परंतु ती ही खोली पावसाळ्यामध्ये गळत असते त्यामुळे या कुटुंबाला कसेबसे रहावे लागते. या कुटुंबाला पावसाळ्यामध्ये खूप हाल सहन करावा लागतो तरीदेखील शंकर कड मंच वर हे त्रास सहन करून बोलठाण येथील मृत व्यक्तीची मनापासून सेवा करतात.
तसेच येथील स्मशान भूमी मध्ये झाडे लावून झाडाला पाणी घालने, स्वच्छता ठेवणे व इतर कामे आवडीने करतात. परंतु प्रत्येक माणसाला जीवन जगण्यासाठी आर्थिक गरज भासत असते.
त्यामुळे शंकर कडमंचवर हे सदर बोलठाण ग्रामपंचायत कार्यालय मध्ये मला आपल्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी म्हणून कायमस्वरूपी घेण्यात यावे आणि पगार देण्यात यावा अशी मागणी करण्यासाठी गेला असता येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे उडवाउडवीचे उत्तर देऊन ग्रामपंचायतीच्या बाहेर काढून दिले जाते तसेच येथील पदाधिकारी यांना याबाबत विचारण्यासाठी गेलो तर तेही मला ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर काढून देतात व तुला पगार दिला जाणार नाही व कायमस्वरूपी घेतले जाणार नाही. असे म्हणून या अगोदर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायतीने तुला काय दिले तर आता आम्ही तुला देणार नाही. अशी भाषा वापरून मला काढून दिले जाते तरी मी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दात मागील व माझ्यावर होणाऱ्या अन्याय संदर्भात बोलठाण ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास बसेल
वेळ पडली तर मी व माझे कुटुंब यांच्यासह आत्महत्या करील यास सदर बोल्थान ग्रामपंचायतीचे प्रशासक व पदाधिकारी जबाबदार राहतील अशीही माहिती शंकर कडमंचावर यांनी म्हटले आहे.