• Total Visitor ( 84172 )

बोलठाण सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत शिवनेरी शेतकरी विकास पॅनलचे बहुमत, तर पाच मे रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड होणार.

Raju Tapal April 29, 2022 36

बोलठाण सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत शिवनेरी शेतकरी विकास पॅनलचे बहुमत, तर पाच मे रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड होणार.

 बोलठाण विविध सेवा सहकारी सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून शिवसेनेचे शिवनेरी शेतकरी विकास पॅनलचे तेरा पैकी 8 उमेदवार निवडून आले असून शिवनेरी शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व या सोसायटीवर प्रस्थापित होईल यात शंका नाही. पाच मे  रोजी चेअरमन व्हाईस चेअरमन होणाऱ्या निवडणुकीनंतर कळेल.
         गोल्डन विविध सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची सभा सचिन खैरनार अध्यसी अधिकारी कथा तत्कालीन सहाय्यक १ सहाय्यक निबंधक, सहकारी सेवा चांदवड तालुका जिल्हा नाशिक यांच्या आदेशान्वये ठेवण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कार्यालय, प्रशासकीय इमारत, विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन खैरनार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
        पाच मे दोन हजार बावीस रोजी चेअरमन चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर मतमोजणीनंतर लगेच मतमोजणी निकाल जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन खैरनार यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये जाहीर केले आहे.
        बोलठाण विविध सेवा सहकारी सोसायटीचे पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे समाधान जाधव, राजेंद्र नहार यांच्या शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांचा धुवा उडवत शिवसेनेच्या शिवनेरी शेतकरी विकास पॅनलचे मनोज रिंढे, संजय बोरसे यांच्या पॅनलने बहुमत प्रस्थापित केले असून एकूण तेरा जागांपैकी 8 उमेदवार विजय झाले आहेत. या विजयी उमेदवारांमध्ये पद्माबाई रिंढे, भगवान बारावकर, भास्कर मुटे, अंबादास पवार, विलास सरोवर, लक्ष्मण जाधव, आशाबाई गवळी,पोपट जाधव आदी उमेदवार निवडून आले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलचे फक्त पाच उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे पाच मे रोजी होणाऱ्या बोलठाण विविध सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन  पदी शिवसेनेचे शिवनेरी विकास पॅनलचे हाती सत्ता येईल.

Share This

titwala-news

Advertisement