• Total Visitor ( 84879 )

कार - रूग्णवाहिकेच्या धडकेत १ जण ठार

Raju Tapal December 01, 2021 30

कार - रूग्णवाहिकेच्या समोरासमोर धडकेत १ जण ठार 

 

बीडहून कोल्हापूरकडे जात असलेली भरधाव कार व नगरहून बीडच्या दिशेने जात असलेली रूग्णवाहिकेची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात कारमधील एक जण ठार झाल्याची घटना धामणगाव रोडवर सुर्डी फाटा येथे घडली.

अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले.

अवधूत नंदकुमार गरगटे वय -३१ रा.इचलकरंजी असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे.

सोमवारी दुपारी पुण्याला रूग्ण घेवून रूग्णवाहिका क्रमांक  एम एच 20 इ जी 5130 रूग्णास सोडून पहाटे बीडला परत जात होती. बीडवरून एक कार क्रमांक एच एच 09 BM 5986 कोल्हापूरकडे सकाळी निघाली होती. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सुर्डी फाट्यावर वळणावर कार आणि रूग्णवाहिका यांची समोरासमोर धडक होवून अपघातात कारमधील अवधूत गरगटे हा जागीच ठार झाला. तिघा जखमींना अहमदनगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. रूग्णवाहिका चालक संतोष सुरवसे रा.बीड हा किरकोळ जखमी झाला आहे.

Share This

titwala-news

Advertisement