कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एका तरूणाचा मृत्यू
दूचाकीस्वाराला वाचविताना कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव आनंद गावाच्या हद्दीत बुधवारी दि.१ डिसेंबरला सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
अल्पेश रफिक मोमीन वय - २२ रा.पिंपरी पेंढार असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव असून या अपघातात एक जण गंभीर झाला आहे.
मारूती कार क्रमांक एम एच ०१ एम ई ३५५० मधून अल्फेश रफिक मोमीन व जावेद इनूस शेख नगर - कल्याण महामार्गाने आळेफाट्याकडे येत होते.
पाऊस सुरू असताना अचानक त्यांच्या गाडीला दुचाकीस्वार आडवा आला. त्याला वाचविताना त्यांची गाडी महामार्गाच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यामध्ये पिंपरी पेंढार येथील अल्पेश रफिक मोमीन याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र जावेद शेख ग़ंभीर जखमी झाला.