श्री.पांडूरंग विद्या मंदीरात मराठी भाषा दिन साजरा
शिरूर :- श्री.क्षेत्र विठ्ठलवाडी ( ता.शिरूर ) येथील श्री. पांडुरंग विद्या मंदिरात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.
प्रसिद्ध मराठी कवी नाटककार व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त प्रभाकर चांदगुडे यांच्याअध्यक्षतेखाली विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कविता,वक्तृत्व,पोवाडे कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी कविता सादर केल्या. आयुष गवारी इयत्ता सातवी श्रुतिका गवारे वेदांत गवारे इयत्ता नववी या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व सादर केले तर कृष्णा ताथवडे इयत्ता पाचवी व राजनंदिनी गवारे इयत्ता आठवी यांनी पोवाडे सादर केले.यावेळी विद्यालयाच्या शिक्षिका संगीता लंघे यांनी कवी कुसुमाग्रज यांचे जीवन चरित्र सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन प्रविणकुमार जगताप व योगिता हरगुडे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता हरगुडे यांनी केले.
प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )