• Total Visitor ( 84162 )

केंद्रीय खर्च निरीक्षक सुरेंद्र पाल सिंग यांनी दिली 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ कार्यालयास भेट 

Raju tapal October 24, 2024 37

केंद्रीय खर्च निरीक्षक सुरेंद्र पाल सिंग यांनी दिली 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ कार्यालयास भेट 

144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील कामकाजाचा घेतला आढावा !

केंद्रीय खर्च निरीक्षक सुरेंद्र पालसिंग यांनी आज 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ कार्यालयास भेट दिली आणि मतदार संघात चालू असलेल्या निवडणूक कामकाजाचा आढावा घेवून, केल्या जाणा-या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. 
    
यावेळी त्यांनी 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील एक खिडकी कक्ष, कंट्रोल रुम, प्रशासन विभाग, सहा.खर्च निरीक्षक पथक, लेखा पथक, VST/VVT कक्ष, आचार संहिता पथक यांची समक्ष भेट घेवून तेथील कामाची कार्यपध्दती जाणून घेतली आणि तेथे कार्यरत संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्गास उपयुक्त सुचना दिल्या.

यावेळी 144- कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रध्दा चव्हाण, राजु राठोड, संजय भोये, टपाली मतपत्रिकेच्या नोडल अधिकारी रिताली परदेशी तसेच निवडणूक कर्तव्यावरील इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
 

Share This

titwala-news

Advertisement