छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबना प्रकाराचा शिरूर येथे निषेध
कर्नाटक राज्यात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या प्रकाराचा शिरूर येथे निषेध करून यासंदर्भातील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शिरूर येथील अखिल भारतीय महासंघाच्या वतीने करण्यात आली.
कर्नाटक येथे झालेल्या प्रकाराचा निषेध करून बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. व पुष्षहार अर्पण करण्यात आला.
पुतळा विटंबना प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे शिरूर शहराध्यक्ष अनिल डांगे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे शिरूर उपाध्यक्ष विश्व पतंगे, शशिकला काळे, उर्मिला फलके, विजया टेमगिरे, राजश्री ढमढेरे ,गणेश सरोदे ,अखिल भारतीय मराठा महासंघ सरचिटणीस सावळाराम आवारी, चिटणीस मनोज ढवळे, सकल मराठा समाज पदाधिकारी रमेश दसगुडे, योगेश महाजन शिवनेरी शिरूर रिक्षा स्टँन्ड अध्यक्ष लियाकत शेख, मराठा महासंघाचे गणेश घावटे, समाधान दसगुडे, विनायक चिकणे प्रा.सतिश धुमाळ आदी यावेळी उपस्थित होते.