छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन गुजर प्रशालेत साजरा
शिरूर दि.११ मार्च २०२५ :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत मंगळवार दिनांक ११ मार्च २०२५ रोजी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन साजरा करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राध्यापक कुंडलिक कदम, विजय राऊत व अलका सातपुते यांनी केले .या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रशालेच्या इयत्ता आठवी ब च्या वर्गातील विद्यार्थिनींनी केले. धनश्री शिंदे या विद्यार्थिनीने संभाजी महाराजांचा जीवनपट विद्यार्थ्यांना उलगडून सांगितला .
शिवाजी महाराजांच्या छाव्याचे महत्त्व व शूरता सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रदर्शित केली. तसेच प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी सुप्रिया कंगले हिने केले.प्राजक्ता ढमढेरे या विद्यार्थिनीने आभार मानले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी सदिच्छा व्यक्त केल्या .
प्रतिनिधी, पत्रकार विजय ढमढेरे ( शिरूर जि.पुणे )