• Total Visitor ( 84816 )

चिमुर तालुक्यातील उमरी फाट्याजवळ झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू

Raju Tapal December 07, 2021 38

चिमुर तालुक्यातील उमरी फाट्याजवळ झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू 

 

नातेवाईकांकडे तेराव्याच्या कार्यक्रमाकरिता वाहनाने जात असताना झालेल्या अपघातात खापरी येथील एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

हा अपघात रविवारी दि.५ डिसेंबरला सायंकाळच्या सुमारास घडला. 

खापरी येथील मेश्राम व चुनारकर कुटूंब एम एच ३४ बी व्ही ३२८४ या वाहनाने चिमूर तालुक्यातील सरडपार येथे  तेराव्याच्या कार्यक्रमासाठी निघाले होते.

उमरी फाट्यावर वळणमार्ग चुकल्याने वाहनाचा भीषण अपघात होवून सायत्रा मोतीराम मेश्राम वय -६५ रा.धर्मू खापरी, मोतीराम भिकारी मेश्राम वय - ७० व कमल चुनारकर वय - ५० रा.ऊर्जानगर चंद्रपूर या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

ताजूल मेश्राम वय -२९ रा.खापरी, चालक अक्षय चुनारकर चंद्रपूर, स्नेहा मेश्राम वय - १२ रा.खापरी, अंकित मेश्राम वय -१० हे चार जण जखमी झाले. जखमींना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

अपघातातील दुस-या घटनेत, फोंडाघाटाच्या सुरूवातीला खिंडीपासून पहिल्याच यु टर्नवरील तीव्र वळणावर फरशीने भरलेला वीस चाकी ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात झाला.

अल्ताफ गुलाल तांबोळी वय -३४ रा. पेरले कराड असे अपघातातील जखमी चालकाचे नाव आहे.

अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिकांनी धाव घेवून चालक तांबोळी यांना ट्रकमधून बाहेर काढले .

महामार्ग पोलीसांनीही घटनास्थळी धाव घेवून वाहतुकीस होत असलेला अडथळा दूर केला. 

Share This

titwala-news

Advertisement