• Total Visitor ( 435913 )
News photo

शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत अजुनही संभ्रमावस्था

Raju tapal June 06, 2025 172

शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत अजुनही संभ्रमावस्था



31 मे ची मुदत संपली , पुढे काय..!



अमरावती :-  मागील तीन महीण्यापासून सुरू असलेल्या शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रीयेत रोज एक नवीन अडथळा निर्माण होत असून शासन निर्णयानुसार ३१ मे रोजी बदलीची मुदत संपल्यामुळे शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार की नाही असा संभ्रम शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.

        ग्राम विकास विभागाच्या १८ जून २०२४ च्या शासन निर्णयानुसार एकूण ७ टप्प्यात शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रीया राबविण्यात येणार आहे.

     ७ नोव्हेंबर २०२४  रोजी ग्राम विकास विभागाकडून २८ एप्रील ते ३१ मे असे प्रत्यक्ष बदली प्रक्रीयेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.  परंतू पुढे या वेळापत्रकात वारंवार बदल करण्यात आला.



विलंबाची कारणे ...!



 ऑनलाईन प्रक्रीयेत  वारंवार निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी , शिक्षक व शिक्षक  संघटना यांनी दाखल केलेली न्यायालयीन प्रकरणे व त्याबाबत उच्च न्यायालयाने पारीत केलेले आदेश, तसेच जुन्या-नव्या संच मान्यतेबाबतचा संभ्रम या सर्व बाबींमुळे शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रीयेत सातत्याने अडथळे निर्माण झाल्याने अजूनही संवर्गनिहाय प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरूवात होवू शकली नाही.



३४ दिवसाचा कार्यक्रम



७ नोव्हेंबर २०२४ च्या वेळापत्रकानुसार संपुर्ण बदली प्रक्रीयेकरीता ३४  दिवसाचा कालावधी लागणार होता. हे वेळापत्रक गृहीत धरले तर आज जरी प्रक्रीया सुरू झाली तरी बदली प्रक्रीया पुर्ण व्हायला जुलै उजाडेल.

    विदर्भ वगळता उर्वरीत महाराष्ट्रातील शाळा १६ जून रोजी तर  विदर्भातील शाळा २३ जून रोजी सुरू होणार आहे, त्यामुळेच आता शाळा सुरू होण्याआधी बदली प्रक्रीया पुर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे बदल्या होणार की नाही याबाबतचा संभ्रम अधिकच वाढला आहे.संध्दा बदली बाबतच्या यादया प्रसिध्द झाल्या आहे.पण समानिकर व रीक्त जागा घोषित झाल्या नाही.या बदली टप्याला वारंवार मुदत वाढ करण्यात येत आहे.विदर्भ वगळता उरवरीत महाराष्ट्राती शाळा १६जूनला सुरु होणार आहे तर विदर्भातील शाळा २३जून पासुन सुरु होणार आहे.त्यामुळे बदल्यांचे टप्ये कसे पूर्ण होईल यात संर्भम निर्माण झाला आहे.



प्रशासनाची उदासिनता कारणीभूत



       प्रशासकीय व तांत्रिक अडचणी आणि न्यायालयीन प्रकरणे यामुळे बदली प्रक्रीया लांबली हे जरी खरे असले तरी वारंवार बदलणारे निकष ,शिक्षण व ग्राम विकास विभागातील असमन्वय आणि प्रशासकीय उदासिनता याबाबी सुद्धा बदली प्रक्रीया लांबण्यासाठी कारणीभूत ठरत असाव्यात.

 त्यामुळे खरं तर शासनाच्या हेतूवरच शिक्षकांकडून शंका निर्माण होवू लागली आहे.

       शासनाने बदली प्रक्रीया तातडीने सुरू करून लवकरात लवकर पुर्ण करावी.



राजेश सावरकर,(राज्य प्रसिध्दी प्रमुख

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती)

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement