ग्रामपंचायत कार्यलयांना दांड्या.दांडी बहाद्दर ग्रामसेवकांना
होणार कारवाई
मुरबाड तालुक्यातील अनेक ग्रामसेवक हे नेमणुक केलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात हजर रहात नसुन ग्रामस्थांना बहुतेक ग्रामसेवक हे स्थानिक ग्रामस्थांना उडवा उडवीची उत्तरे देवुन दांडी मारण्याचे काम करत असल्याचे चित्र सध्या मुरबाड तालुक्यात दिसत आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणारेच ग्राम सेवक जर वेळेला स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात हजर रहात नसतील तर गावचा विकास होणार कसा ? असा प्रश्न नागरीकांमधुन उपस्थित केला जात आहे.
मुरबाड तालुक्यात १२६ ग्रामपंचायती असुन या ग्राम पंचायतींचा कारोभार सांभाळण्यासाठी सध्याच्या स्थितीला मुरबाड तालुक्यात कार्यारत ९३ ग्रामसेवक आहेत.माळशेज घाटाच्या पायथ्या पर्यंत मुरबाड तालुका पसरलेला असल्याने अनेक आदिवासी पाडे वस्त्या या ठिकाणी वसलेल्या आहेत.गावच्या विकासासाठी व तेथिल मुलभुत सुविधा राबविण्यासाठी पंचायत समिती मार्फत सदरील ग्रामसेवकांच्या नेमणुक करण्यात आल्या आहेत.मात्र मुरबाड तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक हे वेळेत हजर होत नसुन सर्रासपणे दांडया मारण्याचे काम करत असल्याचे चित्र सध्या मुरबाड तालुक्यात दिसुन येत आहे.स्थानिक ग्रामस्थांनी कार्यरत असणा-या ग्रामसेवकास काही विचारणा केली तर मिटींग अथवा आँफिसचे काम असल्याचे बहाणे सांगत सरळ सरळ ग्रामपंचायत कार्यालयांना दांडी मारत असल्याचे नागरिकांकडुन बोलले जात आहे.त्यामुळे ग्राम सेवकांवर प्रशासनाचा दबाव नसल्यामुळेच काही दांडी बहाद्दर ग्रामसेवक आपला रोजचा दिवस ढकलण्याचे काम करत असल्याची चर्चा होतांना दिसत आहे.
तालुक्यातील अनेक ग्रामसेवक आपल्या कामाशी अगदी ईमानदारीने रहात असुन कोणत्या ही प्रकारे कार्यालयांमध्ये दांडी न मारता ग्रामपंचायतीचा कारोभार अगदी व्यवस्थीत रित्या सांभाळतांना दिसत आहेत.तर काही ग्रामसेवक प्रशासनाला उल्लु बनविण्याचे काम करत आहेत.कित्येक ग्रामसेवक अगदी काही किलो मिटरच्या अंतरावर असणा-या ग्रामपंचायत कार्यालयात वेळेवर हजर होतांना दिसत नाहीत.तर अनेक ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात दोन ते तीन तास काम करुन घरच्या रस्त्याकडे पळ काढत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे शासनाने या बाबींकडे योग्य लक्ष देवुन दांडी बहाद्दर अथवा दोन तीन तास काम करणा-या ग्रामसेवकांवर शासनाने वचक ठेवुन कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडुन बोलले जात आहे. आजच्या मिटिंग मध्ये सर्व ग्रामसेवकांना सुचना देण्यात आल्या आहेत.शिवाय स्काँटच्या माध्यमातुन तपासणी होणार आहे.जर ग्रामसेवक कार्यालयात हजर नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.(रमेश अवचर गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड)