दौंड टपाल कार्यालयातून सहा मोबाईल संच ,त्यांचे चार्जर चोरीस
-------------------
दौंड टपाल कार्यालयातून सहा मोबाईल संच व मोबाईलचे चार्जर चोरीस जाण्याची घटना घडली.
दौंड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या काळूबाई मंदिरामागे भरवस्तीत असलेल्या टपाल कार्यालयाच्या लोखंडी संरक्षक जाळ्या तुटलेल्या अवस्थेत असल्याचे ८ ऑक्टोबरला सकाळी लक्षात आले. तुटलेल्या संरक्षक जाळ्यांवरून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून कार्यालयातील ट्रेझरी रूमचा कडी ,कोयंडा तोडून त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या लोखंडी पेटीचे कुलूप तोडण्यात आले.
पेटीमधील सोनेरी व काळ्या रंगाचे लिनोव्हो कंपनीचे चार्जर सहीत ५ मोबाईल संच, पॅनोसोनिक कंपनीचा एक विनाचार्जर मोबाईल संच चोरीस गेला.
टपाल खात्याच्या मालकीचे हे मोबाईल संच पोस्टमनला दररोजचे टपाल व पार्सलचे वितरण सुसह्य करणे तसेच कार्यालयीन व्यवहारांसाठी दररोज दिले जातात. कार्यालय बंद होण्यापूर्वी जमा करून घेतले जातात.
पोस्टमास्तर अफरोज अत्तार यांनी याबाबत दौंड पोलीस ठाण्यात 35 हजार 500 रूपये मुल्य असलेले सीमकार्डसहीत 6 मोबाईल संच 5 चार्जर चोरीस गेल्याची फिर्याद दिली.