दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना कोतवाली पोलीसांकडून अटक
Raju tapal
October 09, 2021
37
दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना कोतवाली पोलीसांकडून अटक
----------------
दरोड्याच्या तयारीत असलेल्या ५ जणांना अहमदनगर येथील कोतवाली पोलीसांनी जेरबंद केले.
अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या माळीवाडा एस टी स्टँन्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या प्रवीण संजय गंगावणे वय -२५ रा.गुरवपिंप्री ता.कर्जत जि.अहमदनगर, मुकेश शंकर सावंत वय -३४ रा.सांगवी आष्टी ता.आष्टी जि.बीड, सुनील ललीत थापा वय -५७ रा.भांडूप मुंबई, हल्ली रा.घोगरगाव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर, सुनील कैलास खरमाटे वय ३५, शंकर हिरामण शिरसाठ वय -२२ रा. दोघेही पिंपळगाव टप्पा ता.पाथर्डी जि.अहमदनगर या पाचजणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडून एक लोखंडी तलवार, तीन लाकडी दांडके, एक लोखंडी कटावणी, गावठी बनावटीचे पिस्तूल असा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, भिंगारदिवे, नितीन शिंदे, दिपक रोहकले, तानाजी पवार, सुजय हिवाळे, शरद गायकवाड,,भारत इंगळे या पोलीस पथकाने ही कारवाई केली.
पोलीसांनी आरोपींची झाडाझडती घेतली त्यावेळी गावठी कट्टा, जिवंत काडतुसे याबरोबरच खाकी ड्रेस, वाकी टॉकी त्यांच्या कब्जातून हस्तगत केले.
पोलीस असल्याचे भासवून एखाद्या ठिकाणी आरोपी जात असावेत असा संशय पोलीसांना आला आहे.
Share This