दारूच्या नशेत मित्रांकडून मित्राचा खून
Raju Tapal
December 16, 2021
51
दारूच्या नशेत मित्रांकडून मित्राचा खून ; खेड तालुक्यातील खरपुडी येथील घटना
दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रूक येथे घडली.
रामदास सोपान थिटे वय - २७ रा. सडकवस्ती ,रेटवडी ता.खेड असे खून झालेल्या तरूणाचे नाव असून दत्तात्रय रामदास टाकळकर हे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.
कनेरसर - खेड रस्त्यावरील खरपुडी बुद्रूक येथील हॉटेल माथेरान गारवा जवळ बुधवार दि.१५/१२/२०२१ रोजी रात्री ही घटना घडली.
अतुल थिटे यांनी या घटनेची फिर्याद खेड पोलीसांत दिली असून खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिश गुरव या घटनेचा तपास करीत आहेत.
Share This