दिपक भाऊ कांबळे यांचा अशीही सामाजिक बांधिलकी
इंदिरानगर येथील घोटसई रोड वरील स्मशानभूमीच्या लोखंडी रॉड चोरी झाल्याने तेथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. सदर बाबत दैनिक जनमत व टिटवाळा न्यूजने बातमी प्रकाशित केली होती. सदर बातमीची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते दीपकभाऊ कांबळे यांनी स्वखर्चाने येथील स्मशानभूमीत लोखंडी रॉड लावून दिले. त्यामुळे इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी व संघर्ष रहिवासी संघटना इंदिरा नगर, टिटवाळा यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. याबाबत दीपक भाऊ कांबळे यांनी सांगितले की स्मशानभूमीची दयनीय अवस्था पाहून खूपच अस्वस्थ झालो आपनालाही एक दिवस अश्याच ठिकाणी यावे लागेल ही सामाजिक भावना लक्षात घेऊन आपण सदरचे काम करून दिल्याचे टिटवाळा न्युजशी बोलताना सांगितले.