दीपक केसरकर ठरले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार
Raju tapal
November 04, 2024
71
दीपक केसरकर ठरले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संपत्तीत पाच वर्षांत तब्बल 39 कोटी रुपयांची वाढ होऊन ती आता 121 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार दीपक केसरकर,राजन तेली,विशाल परब व अर्चना घारे-परब या चार उमेदवारांच्या संपत्तीचे तपशील निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले आहे.
.
सावंतवाडी:-महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन तेली, अपक्ष उमेदवार विशाल परब आणि अर्चना घारे-परब यांच्या संपत्तीचे तपशील निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले असून यामध्ये दीपक केसरकर हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. 2019 साली 82 कोटींची संपत्ती असलेल्या दीपक केसरकर यांच्या संपत्तीत पाच वर्षांत तब्बल 39 कोटी रुपयांची वाढ होऊन ती आता 121 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
दीपक केसरकर यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता, नॉन-एग्रीकल्चर जमिनी, शेतीची जमीन आणि अपार्टमेंटसह अनेक विविध प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे नॉन एग्रीकल्चर जमीन:-57 कोटी 44 लाख रुपये एग्रीकल्चर जमीन:- 49 कोटी 60 लाख रुपये, निवासी अपार्टमेंट:- 2 कोटी 30 लाख रुपये,व्यवसायिक अपार्टमेंट:-12 कोटी 43 लाख रुपय, बँक खाते:दीपक केसरकर यांच्या बँक खात्यात 1 कोटी 39 लाख रुपये, तर पत्नीच्या नावावर 27 लाख 69 हजार रुपये आहेत, सोने आणि दागिने:-दीपक केसरकर यांच्या नावे 12 लाखांचे दागिने, तर त्यांच्या पत्नीच्या नावे 89 लाख रुपये किमतीची ज्वेलरी आहे.कर्ज:-केसरकर यांच्यावर 4 कोटी 90 लाखांचे कर्ज, तर त्यांच्या पत्नीवर 6 लाख 33 हजार रुपयांचे कर्ज आहे.इतर गुंतवणूक:- पोस्टात केसरकर यांच्या नावे 1 लाख 53 हजार रुपयांची गुंतवणूक, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 4 लाख रुपयांची गुंतवणूक आहे.
राजन तेली:-संपत्ती दुपटीने वाढली
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांच्या संपत्तीतही महत्त्वपूर्ण वाढ झाली आहे. 2019 मध्ये 14 कोटी 30 लाख रुपयांची संपत्ती असलेल्या तेली यांनी आता 28 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.स्थावर मालमत्ता:-10 कोटी 93 लाख रुपये,पत्नीच्या नावे मालमत्ता:- 12 कोटी 87 लाख रुपये,वाहने:- तेली यांच्या नावावर फोर्ट इनडिव्हर, पत्नीच्या नावे होंडा अॅक्टिवा स्कूटर, टोयोटा इनोव्हा, महिंद्रा एक्सयूव्ही अशा वाहनांचा समावेश आहे.इतर गुंतवणूक: दोन कोटी 11 लाख रुपयांची गुंतवणूक, यात प्रथमेश कन्स्ट्रक्शन, इंद्रधनु इन्फ्रास्ट्रक्चर, ग्लोबल असोसिएट यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.सोने व दागिने:- राजन तेली यांच्या नावे 5 लाख रुपयांचे दागिने, तर पत्नीच्या नावे 20 लाख 80 हजार रुपयांची ज्वेलरी आहे.,कर्ज:- तेली यांच्यावर 2 कोटी 21 लाख रुपयांचे, तर त्यांच्या पत्नीवर 2 कोटी 33 लाख रुपयांचे कर्ज आहे.
विशाल परब:-अपक्ष उमेदवाराची संपत्ती
अपक्ष उमेदवार विशाल परब यांची संपत्ती 30 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यांनी विविध वाहनांपासून ते महागड्या गाड्यांपर्यंत आपल्या संपत्तीत गुंतवणूक केली आहे.,स्थावर मालमत्ता:- 16 कोटी रुपये,सोने व दागिने:- नऊ कोटी रुपयांची ज्वेलरी, तर त्यांच्या पत्नीच्या नावे एक कोटी 38 लाख रुपयांची ज्वेलरी आहे.वाहने:-त्यांच्या नावावर अॅक्टिवा हाय जुबा स्कार्पिओ, फॉर्च्युनर, मर्सिडीज, फोर एक्सयूव्ही 500, रेंज रोवर तसेच चार डंपर, तर पत्नीच्या नावे महिंद्रा थार, बीएमडब्ल्यू जीटी, सुजित मॅक्सेल 125 आहेत.,कर्ज:-परब यांच्यावर 6 कोटी 90 लाख रुपयांचे, तर त्यांच्या पत्नीवर 6 लाख रुपयांचे कर्ज आहे.
अर्चना घारे-परब:-स्थावर व जंगम मालमत्तेचा तपशील
अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांची जंगम मालमत्ता 2 कोटी 33 लाख 61 हजार 54 रुपये आणि स्थावर मालमत्ता 7 कोटी 55 लाख 86 हजार रुपये आहे.सोने व चांदी:-286 ग्रॅम सोन्याचे मूल्य 23 लाख 4 हजार 510 रुपये आणि 500 ग्रॅम चांदीचे मूल्य 41 हजार 250 रुपये आहे.वाहने:- 26 लाख 19 हजारांच्या दोन गाड्या, तर त्यांच्या पतीकडे 7 लाख 80 हजार 574 रुपये किमतीची गाडी आहे.,कर्ज:-अर्चना घारे-परब यांच्यावर 17 लाख 89 हजार 281 रुपयांचे, तर पतीवर 21 लाख 62 हजार 890 रुपयांचे कर्ज आहे.
राजन तेली यांच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. त्यात दोन आंदोलनाचे आहेत तर विशाल पराब यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे.दीपक केसरकर राजन तेली आणि विशाल परब हे बीकॉम पदवीधर आहेत.तर अर्चना घारे परब या सिविल इंजीनियरिंग मध्ये पदवीधर आहेत.
Share This