आमदार किसन कथोरे यांना मंत्रीपद देण्याची मागणी
आमदार किसन कथोरे यांना मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी वसत शेलवली ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र भोईर व ठाणे जिल्ह्यातील जनतेने महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.
नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली आहे. आमदार किसन कथोरे हे पाचव्यांदा भरघोस मतांनी निवडून आले आहेत.
याबाबत वसत शेलवली ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र भोईर यांनी सांगितले की विकासाचे वादळ म्हणून संबोधले जाणारे विकास पुरुष कार्यसमाट आमदार किसन कथोरे हे सलग पाच वेळा निवडून आलेले आहेत. तसेच सर्वात जास्त निधी उपलब्ध करून देणारा आमदार म्हणून किसन कथोरे यांचे नाव घेतले जाते, यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन आमदार किसन कथोरे यांना मंत्रीपद देऊन ठाणे जिल्ह्यातील जनतेची मागणी नक्कीच महायुतीचे वरिष्ठ नेते पूर्ण करतील असे आम्हाला वाटते, ज्या प्रमाणे मुरबाड विधानसभेत विकासाची कामे केली आहेत, त्याप्रमाणे महाराष्ट्रात विकास काम करण्याची संधी दयावी गेल्या कित्येक वर्ष पासुन मुरबाड विधानसभेला मंत्रीपद मिळाले नाही आमदार किसन कथोरे यांच्या नावाने मंत्रीपद मिळेल असे वाटते.