• Total Visitor ( 134154 )

दहावीची परीक्षा झाली आणखी सोपी

Raju tapal October 22, 2024 84

दहावीची परीक्षा झाली आणखी सोपी; 
आता ३५ नाही तर २० मार्क मिळाले तरी होणार पास; 
गणित, विज्ञानात २० गुण मिळाले तरी मिळणार अकरावीत प्रवेश 

मुंबई:-महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत बदल केल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना यापुढे गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये ३५ ऐवजी २० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तरी त्यांना अकरावीत प्रवेश मिळणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे.

शाळेत लहानपणापासून गणित या विषयाचं नाव घेतलं तरी भल्याभल्यांच्या पोटात गोळा येतो.  एकतर हा विषय कधीच आपलासा वाचक नाही आणि त्या विषयाचा पेपर म्हटलं की जीव आणखीनच नको नकोसा होऊन जातो. अनेक विद्यार्थ्यांच्या मनात गणिताचा फोबिया असतो.  गणिताची भीती जोवर मनातून जात नाही, तोवर तो विषय त्यांच्या आवडीचा होणार नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी अकरावीमध्ये प्रवेश घेता घेणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे.

बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी असा विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊ शकणार आहे. मात्र त्यांच्या  रिझल्टवर एक विशिष्ट शेरा देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दोन पर्याय  समोर येणार आहे. एक  म्हणजे  प्रमाणपत्र घेऊन  अकरावीसाठी प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे. मात्र हा पर्याय त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना पुढे गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत कोणतेही करिअर करायचे नाही. त्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू होणार आहे.  त्यामुळे ज्यांना विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचे नाही त्यांना याचा फायदा होणार आहे..  यामुळे विद्यार्थ्यांसाठी गणित किंवा विज्ञान विषयाची भिती कायमची वजा होणार आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement