धोकादायक विद्युत खांब हटवण्याची मागणी
कल्याण ग्रामीण मधील गोवेली महावितरण अंतर्गत रायते येथील वैष्णोदेवी मंदीर परिसरातील अनेक वर्षापासून मुठोळकर चाळीजवळ ऊभा असलेल्या जिर्ण विद्यूत (पडीक) खांब त्वरित हटवण्याची मागणी येथील रहिवाशांनी महावितरणला केली आहे.सदर खांब कधीही कोसळण्याच्या अवस्थेत आहे यामुळे रहिवाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असल्याने खांब त्वरीत हटविण्यात यावा अशी लेखी मागणी येथील रहिवाशाकडून करण्यात आली असून महावितरणच्या संबधित अधिकारी (टिटवाळा-गोवेली) यांना दि ३०'/८/२०२१.रोजीलेखी व ग्रुप ग्रामपंचायत रायते -पिंपळोली यांनी देखील लेखी निवेदन देऊन महावितरणचे लक्ष वेधले आहे.
अधीकार्याला वारंवार तोंडी सांगितले आहे. त्यांचे लाईनमन खांब पाहून गेले आहेत. या तक्रारीस दहा महिने उलटून गेले. परंतु अजूनही दखल घेतली गेली नाही. जीवीत हानी झाली तर याला जबाबदार कोण?असा सवाल येथील रहिवाशी करीत आहेत.
"पावसाळा तोंडावर आला असल्याने खांब कधी केव्हा पोल कोसळून पडेल हे नाकरता येत नाही शिवाय या अंगणात शाळकरी लहान मुले देखील या अंगणात खेळत असतात मोठी हानी झाली तर याला जबाबदार कोण? "