• Total Visitor ( 84593 )

धोकादायक पुलावरून ऊस वाहतूक करणारी बैलगाडी पाण्यात पडून बैलाचा मृत्यू

Raju Tapal November 07, 2021 39

धोकादायक पुलावरून ऊस वाहतूक करणारी बैलगाडी पाण्यात पडून बैलाचा मृत्यू ; इंदापूर तालुक्यातील राजवडी ते कालठण रस्त्यावरील घटना 

    

धोकादायक पुलावरून ऊस वाहतूक करणारी बैलगाडी पाण्यात पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील राजवडी ते कालठण रस्त्यावरील पुलावर घडली.

या पुलाची उंची वाढविण्याबरोबरच पुलाला संरक्षक कठडे बसवावेत या शिर्षकाखाली मराठी १ न्यूज चॅनेलने  दि.२८/१०/२०२१ रोजी बातमी प्रसारित केली होती. 

पुलाला संरक्षक कठडे नसल्याने हा अपघात झाला.

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यास कालठण नंबर १ कळाशी, गंगावळण, , करेवाडी, बनकरवाडी, अगोली नंबर  दोन व तीन या गावातील ऊस वाहतूक या  पुलाच्या रस्त्यावरून होत असते.

दि.६ ऑक्टोबरला कालठण येथून ऊस घेवून बाळू बाबू भिसे रा.मलठण ता.कर्जत जि.अहमदनगर व त्यांच्या पत्नीची  कर्मयोगी साखर कारखान्यास ऊस वाहतूक करणारी गाडी क्रमांक ९७ पुलास संरक्षक कठडे नसल्याने थेट ८ ते १० फुट पाण्यात पडून झालेल्या अपघातात ७० ते ८० हजार रूपये किंमत असलेल्या बैलाचा ऊस अंगावर पडल्याने मृत्यू झाला.

ऊस वाहतूक करणारे भिसे व त्यांच्या पत्नीने प्रसंगावधान राखून पाण्यात उडी टाकल्याने ते बचावले. 

कर्मयोगी कारखान्याने तातडीने जेसीबी व सुरक्षारक्षक पाठविले. कालठण व राजवडी परिसरातील ग्रामस्थांनी मदत केल्याने बाळू भिसे व त्यांची पत्नी वाचली.

ऊस वाहतूक करणा-या बैलांचा विमा कारखाना उतरवत असल्याचे कारखान्याच्या कृषी विभागाने यावेळी स्पष्ट केले.

उजनी धरण १०० टक्के भरल्यानंतर पाणी फुगवटा वाढल्यानंतर तसेच मोठा पाऊस पडल्यानंतर हा पूल पाण्याखाली जात असल्याने तसेच पुलाला संरक्षक कठडे नसल्याने आजपर्यंत शेकडो लहानमोठे अपघात होवून जिवित व वित्तहानी झाली आहे.त्यामुळे पुलाची उंची वाढवावी  ,पुलास संरक्षक कठडे उभारावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मांढरे , तानाजी गुलाबराव काळे यांनी केली आहे.

सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री, कर्मयोगी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील ,संचालक हनुमंत जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने, पंचायत समिती सदस्य पुष्पा रेडके यांनी ५० वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन दीक्षित यांनी केली आहे.

पाण्याखाली जाणा-या या पुलाची उंची वाढवावी तसेच या पुलाला संरक्षक कठडे बसवावेत या शिर्षकाखाली मराठी १ न्यूज चॅनेलने दिनांक २८/१०/२०२१ रोजी वृत्त प्रसारित केले होते.

Share This

titwala-news

Advertisement