ज्ञानेश्वरी घरोघरी पोहचविण्याच्या उपक्रमाची श्री.क्षेत्र आळंदीत सांगता
माऊलींच्या ७२५ व्या सोहळ्यानिमित्त गावोगावी जाऊन ज्ञानेश्वरी घरोघरी पोहचविण्याच्या उपक्रमाची श्री.क्षेत्र आळंदीत सांगता झाली.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून ज्ञानेश्वरी घरोघरी पोहचविण्यासाठी श्री. ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी व महंत ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज पाटील यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे वर्षभर गावोगावी जाऊन श्री.ज्ञानेश्वरी नवव्या व बाराव्या अध्यायाचे सामुहिक पारायण ,कीर्तन सेवा करण्यात आली.
मंगळवारी दि .७ डिसेंबरला ग्रंथदिंडी,नगरप्रदक्षिणा ,ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर यांचे काल्याचे किर्तन ,महाप्रसाद होवून उपक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी ज्या १०८ ठिकाणी उपक्रम राबविला अशा श्री.ज्ञानेश्वरी ग्रंथाची सेवा व प्रसार करणा-यांना माऊलींच्या चलपादुका देवून गौरविण्यात आले. तसेच वर्षभर ज्ञानेश्वरी ग्रंथावर आधारीत ऑनलाईन प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली होती.
गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते.बक्षीस वितरण करण्यात आले.
शांतीब्रम्ह मारोती महाराज कु-हेकर , विष्णूमहाराज चक्रांकीत ,डॉ.नारायण महाराज जाधव, योगिराज महाराज गोसावी, ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील, चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, नगराध्यक्षा वैजयंता उमरेगर, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, महाराष्ट्र राज्य शिक्षण समिती सदस्य अजित वडगावकर , आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते, माजी विरोधी पक्षनेते डी डी भोसले, श्रीधर सरनाईक, डॉ.दीपक पाटील, नरहरी महाराज चौधरी, चरित्र समितीचे प्रसिद्धीप्रमुख एम डी पाखरे, सुनील बटवाल, ज्ञानेश्वर फड, प्रभुराज महाराज पाटील ,चरित्र समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरींच्या १ ते १८ अध्यायांवर आधारीत प्रथम ऑनलाइन प्रश्नमंजूषा परिक्षेतील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमात ८६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .त्यापैकी १६ जणांना बक्षिस देवून गौरविण्यात आले.
दत्तात्रय भीमराव बोरकर आळंदी, बालाजी नरसिंग शेंडगे लातूर, दिपक नवनाथ शिंदे आळंदी, जगदीश यमाजी हांडे औरंगाबाद, ओंकार विलास दुंडे आळंदी, सोमनाथ हनुमान मोरे बीड, ज्ञानदेव आनंदराव ढेकळे औरंगाबाद, दीपक पाटील मुक्ताईनगर, सखाराम राधाकिसन पितळे आळंदी, राजलक्ष्मी राजेंद्र झामरे आळंदी, डॉ.शेखर शामराव देशमुख परभणी, आकाश उद्धवराव सोनवणे आळंदी, अजय शंकरराव खैरनार औरंगाबाद, राजाराम आसाराम काटे आळंदी, आसाराम विष्णू आव्हाड आळंदी या गुणवंतांना ज्ञानेश्वरी, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.
ऑनलाईन परिक्षा उपक्रमासाठी राजेश किराड, नरसिंह पांचाळ यांनी परिश्रम घेतले. ही परिक्षा ४ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आली होती.