डिझेल वाहतूक करणा-या टँकरला अचानक आग
Raju tapal
October 06, 2021
33
डिझेल वाहतूक करणा-या टँकरला अचानक आग ; हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील घटना
----------------
पुणे -सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती येथे डिझेल वाहतुक करणा-या टँकरने अचानक पेट घेतल्याची घटना आज मंगळवार दि.५/१०/२०२१ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
चालकाने समयसुचकता दाखवून डिझेल वाहतूक करणारा टँकर महामार्गावरून बाजूला घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.
एम एच १२ एल टी ८६०० या टँकरवरील चालक विष्णू आंबेकर वय २८ रा.कदमवाकवस्ती ता.हवेली मूळ रा.बीड जिल्हा हे पुण्यातील लडकत सर्विस येथे टँकर खाली करून पुन्हा भरण्यासाठी लोणीकाळभोर येथील हिंदूस्थान पेट्रोलियम टर्मिनल कडे निघाले होते.
कवडीपाट टोलनाका परिसरात ते आले असताना टँकरच्या केबलमध्ये वायर जळाल्याचा वास आला.
मोकळ्या जागेत टँकर उभा केला असता केबिनमधून मोठ्या प्रमाणात धूर येवू लागला. मोठा जाळ होताच चालक आंबेकर व क्लिनर तुळशीराम कवटे खाली उतरले. उतरताच कवटे यांच्या डाव्या हाताला भाजले. उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले.
Share This