जिल्हास्तरीय अंतराळ दिवस साजरा
शेकडो विद्यार्थांचा सहभाग
अमरावती/भातकुली :- पुरोगामी विद्यालय आसरा च्या विद्यार्थ्यांनी केले उत्कृष्ट सादरीकरण पुरोगामी विद्यालय आसरा येथे नेहमीच विज्ञान विषयावर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन विज्ञान शिक्षक करत असतात. यावेळी सुद्धा अशाच प्रकारच्या उपक्रमात सहभागी करून विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारची अनुभुती दिली. विज्ञान भारती विदर्भ प्रदेश व नरसम्मा काँलेज अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे दि, १९-०८-२०२५ रोजी जिल्हा स्तरीय अंतराळ दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये माँडेल मेकिंग,पोस्टर बनविने, रांगोळी स्पर्धा ईत्यादी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर अपल्या मधिल सर्जनशीलता वापरून सादरीकरण केले.
पुरोगामी विद्यालय आसरा येथील विद्यार्थी नमन राहुल मोहोड, आनंदी प्रविण सोळंके, श्रुतिका राम गाळे या विद्यार्थ्यांनी आपल्या कलांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांचा मुख्य विषय स्पेस स्टेशन बांधकाम हा होता. या विषयावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पोस्टर माँडेल, व रांगोळी काढली.
या विद्यार्थ्यांना शाळेतील उपक्रमशील विज्ञान शिक्षक जि आर वडतकर सर, ए एस बोबडे सर यांनी विज्ञान शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव दिलेत. याबद्दल शाळेतील मुख्याध्यापिका विल्हेकर मँडम, राठोड सर,गांजरे सर, उईके सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
====================