दिवाळीचा फराळ महागला;लॉकडाऊनमुळे फराळासाठी लागणारे विविध जिन्नसांचे भाव वाढलेत.
Raju Tapal
October 27, 2021
33
यंदा दिवाळीचा फराळ महागला आहे. इंधन दरवाढ, लॉकडाऊनमुळे फराळासाठी लागणारे विविध जिन्नसांचे भाव वाढलेत. त्यातच कोरोना, लॉकडाऊनचा खाद्य पदार्थांनाही फटका बसला आहे. त्यामुळे दिवाळीचा फराळ महागला आहे. खाद्यतेलासह विविध जिन्नस महागले आहेत. खाद्यतेलासह विविध जिन्नसही महागले आहेत. खोबऱ्यानेही भाव खाल्ला आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे खरेदीवर मर्यादा आल्या आहेत.
महागाईचा भडका उडताना दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरल मागे 100 रुपयांच्यावर गेले आहेत. याचा फटका हा वाहतूक व्यवसायाला बसला आहे. वाहतुकीचे दर वाढल्याने खाद्य पदार्थांच्या किमतीवर याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळ महागाईत अधिक भर पडत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तेल, खोबरे, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी आदींच्या भावात वाढ झाली आहे.
खाद्यतेलाचे चढे दर आणि विविध जिन्नसांच्या किंमतीत झालेली वाढ यामुळे दिवाळीच्या फराळासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्वच जिन्नसांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तेल, तूप, बेसन, मैदा, चणाडाळ, सुकामेवा महाग झाला आहे. फराळाचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत.
Share This