डोंबिवलीत बलात्कार प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांनी कल्याण येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त याची भेट घेतली व चर्चा केली, तसेच बलात्कार प्रकरणी केसची माहिती घेतली, डोंबिवलीत मागील आठवड्यात काळीमा घडणारी घटना घडली, एका मुलीवर 33 नरधामांनी बलात्कार केला, या घटनेने संपूर्ण डोंबिवली सह महाराष्ट्र हादरून गेला, आतापर्यंत 33,आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, विधानपरिषदेचया उपसभापती निलम गोरे यांनी आज अतिरिक्त पोलीस आयुक्त दंत्रातय कळाळ यांची भेट घेतली व डोंबिवली येथील बलात्कार केसची माहिती घेतली, त्या नंतर प्रत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की युवकांना प्रबोधन करणे फार गरजेचे आहे, प्रबोधन करण्यासाठी सामाजिक संस्था पुढे आल्या पाहीजेत, तसेच पोलिसांनी सवैच आरोपींना अटक केली आहे, अधिक तपास सुरू आहे, आरोपींना जास्त जास्त सजा झाली पाहिजे, मुलीच्या कुटुंबीयाची भेट घेतली, चौकशी केली, मुलीला पुढे शिक्षण सुरू ठेवायचे आहे, त्या साठी हि चर्चा केली, शासनाकडून पंधरा दिवसांत मदत देण्यात येईल, असे सांगितले, यावेळी आमदार विशवनाथ भोईर, माजी महापौर विनीता राणे, रमेश जाधव, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, रवी कपोते, शालीनी वायले, महीला जिल्हा संघटक विजया पोटे, छायाताई वाघमारे, आदी उपस्थित होते,