• Total Visitor ( 488371 )
News photo

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोंढापुरी येथे साजरी 

Raju Tapal publisher April 20, 2026 18

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोंढापुरी येथे साजरी 

           

शिरूर :- भारताच्या इतिहासातील महान महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे रविवार १९ एप्रिलला साजरी करण्यात आली. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कार्यालय इमारत,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गणेगाव खालसा रस्ता,विकास नगर रस्ता,विठ्ठल रूक्मिणी मंदीर, ग्रामपंचायत कार्यालय चौक, गावचे प्रवेशद्वार, हनुमान मंदीर पटांगण , सोसायटी कार्यालय अशी डी जे वाद्याच्या गजरात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा कार्यकर्त्यांनी मिरवणूकीत दिल्या. मिरवणूकीत लहान मुलेही सहभागी झाली होती. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती अशी:- महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू येथे झाला.भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते.समाजातील विषमता दूर करून समानता यावी यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्यभर कार्य केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.त्यांनी भारताला सर्वात मोठे समतावादी संविधान दिले. संविधान म्हणजे केवळ एक पुस्तक नाही .तर तो आपल्या जगण्याचा श्वास आहे.आपण संविधानाचा आदर केला तरच संविधान आपले रक्षण करेल.संविधान म्हणजे मतदानाचा अधिकार,धार्मिक स्वातंत्र्य,स्वातंत्र्य समता आणि बंधुता,संवैधानिक नैतिकता आणि बंधुभाव,समानतेचा अधिकार,भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य,शिक्षणाचा आणि रोजगाराचा अधिकार,शोषणाविरूद्धचा अधिकार.महाड चवदार तळे,सत्याग्रह,खेळण्याचा हक्क आणि मंदीर प्रवेशासाठी चळवळीच्या माध्यमातून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांती केली.त्यांच्या विचारांनी भारतातील अनेक वंचित घटकांना जगण्याची नवी दिशा मिळाली.त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून आणि लंडनमधून उच्च शिक्षण पूर्ण केले.समाजातील अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी बौद्ध धर्म त्यांनी स्विकारला.लाखो अनुयायांना समानतेचा मार्ग दाखविला.६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement