दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार ; वळसे ता.सातारा येथील घटना
वळसे ता.सातारा येथे दुचाकीला झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
ऋषिकेश चंद्रकांत गोळे वय - २१ रा.हिल रेंज माध्यमिक विद्यालय भिलार महाबळेश्वर जि.सातारा असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव असून अविनाश दिलीप गोळे रा.करहर ता.जावळी असे अपघातात जखमी झालेल्याचे नाव आहे.
वळसे येथील अजिंक्यतारा सहकारी सुत गिरणीसमोर कराड बाजुकडे जाणा-या महामार्गावर होंडा शाईन दुचाकीला अपघात झाला. अपघाताबाबत अधिक माहिती समजू शकली नाही.
घटनास्थळी बोरगाव ,कराड महामार्ग पोलीसांनी धाव घेतली.