शिक्षक संघटना समवेत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची बैठक संपन्न
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
अमरावती दि.१६ :- मंगळवारी (दि. १५ एप्रिल २०२५) शिक्षक संघटनासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने विविध विषयावर शालेय शिक्षण मंञी दादाजी भुसे आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या सोबत विविध विषयांवर चर्चा केली.यामध्ये
१. अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करणे.
२. शाळा स्तरावरील १५ समित्या रद्द करून ४ समित्यांमध्ये कार्यान्वित ठेवणे.
३. ऑनलाईन कामकाज कमी करणे.
४. विविध योजनांमधून शाळांचा पायाभूत विकास करणे.
४. संचमान्यता निकष शासन निर्णयात बदल करणे १५/०४/२०२४ संच मान्यता निकष शासन आदेश निकष दुरुस्ती करणे बाबत.
या विषयांवर मा. शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांनी संघटनांना उत्तम मार्गदर्शन केले, सर्व संघटना पदाधिकाऱ्यांचे विचार व समस्या ऐकून घेतल्या व त्यावर अधिकाऱ्यांना सूचना देऊन आवश्यक त्या सुधारणा करण्या संदर्भात आदेश दिले.
या बैठकीसाठी शिक्षण आयुक्त मा. सचिंद्र प्रताप सिंह, SCERT चे संचालक मा. राहुल रेखावार, उपसचिव मा. समीर सावंत, उपसचिव मा. तुषार महाजन, प्राथमिक शिक्षण संचालक मा. शरद गोसावी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्य नेते मा. उदयराव शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य कार्यालयीन चिटणीस मा. किशोर पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य मा. विशाल कणसे, साताऱ्याचे प्रतिनिधी मा धिरेश गोळे सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने विजय कोंबे यांनी अशैक्षणिक कामे, शाळा स्तरावरील विविध समित्या, संचमान्यता,आधार आधारित संचमान्यता,शाळांतील विविध जुनी उपकरणे व वस्तुंचे निर्लेखन, शालार्थ वेतन प्रणाली, शाळांच्या भौतिक विकासासाठी आवश्यक सुविधा, BLO, U-DISE, Saral, Apar ID, SQAAF, शिक्षकांना ग्रामसभेसाठी दिल्या जाणाऱ्या नियुक्ती, घरकुल प्रमाणपत्र वितरण, ग्राम पंचायत प्रशासक अशा विविध विषयांवर भूमिका विशद केली.असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.