संचमान्यता संबंधाने सकारात्मक निर्णय घेण्याबाबत शिक्षणमंञ्यांचे आश्वासन...
प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने घेतली शिक्षणमंञी व शिक्षण राज्यमंञ्यांची भेट
अमरावती दि.२५ -: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या राज्य पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी (दि. २५ फेब्रुवारी) राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे साहेब, शिक्षण राज्यमंत्री ना. डॉ. पंकजभाऊ भोयर साहेब यांचेसह शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन साहेब यांची भेट घेतली. २०२४-२५ च्या संचमान्यतेमुळे अतिरिक्त होणारे शिक्षक व विद्यार्थ्यांची अडचण यासह अनेक प्रलंबित विषयवार चर्चा झाली.
संचमान्यतेसंबंधाने (इयत्ता ६-८) तातडीने आवश्यक अशी अनुकूल कार्यवाही करण्याचे मान्यवरांनी मान्य केले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्य नेते मा. उदयराव शिंदे,राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष मा. आनंदा कांदळकर, मा. राजन सावंत, राज्य सरचिटणीस मा. राजन कोरगावकर, कार्यालयीन चिटणीस मा. किशोर पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य मा. विशाल कणसे, नाशिक जिल्हा शाखेचे अध्यक्ष मा. प्रकाश अहिरे, युवा पदाधिकारी मा. सुमित बच्छाव आदी उपस्थित होते.असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.