• Total Visitor ( 84377 )

विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर यांची निवड निश्चित;

Raju tapal December 09, 2024 9

विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर यांची निवड निश्चित;
राहुल नार्वेकर यांच्या नावाची उद्या औपचारिक घोषणा होणार 

 भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत. राहुल नार्वेकर यांनी आज रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अर्ज अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला. काल दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. तोपर्यंत राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात आहे.

मागील दोन दिवसांपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असून त्यात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. काल दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणिभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ सचिवांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. दिलेल्या मुदतीत केवळ राहुल नार्वेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आज (९ डिसेंबर) राहुल नार्वेकर यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार आहे. राहुल नार्वेकर हे भाजपचे कुलाबा मतदारसंघातील आमदार आहेत. राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत.

त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी वकील काम केलं आहे. अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करायचे. मुंबई महापालिका तसंच इतर विषयांच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेची बाजू मांडण्याचं काम राहुल नार्वेकर करत असत. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही इंग्रजी टीव्ही चॅनलवर त्यांनी पक्षाची बाजू मांडली आहे. २०२२ साली वयाच्या ४५ व्या वर्षी ते विधानसभा अध्यक्ष बनणारे पहिलेच तरुण अध्यक्ष होते. नार्वेकर हे कायद्याचे पदधीवर असून त्यांनी बऱ्याच संस्थांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम केले आहे. राहुल नार्वेकरांच्या राजकीय कारकि‍र्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली, त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले आणि सध्या ते भाजपात आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते जावई आहेत.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावर निवड झाली होती. शिवसेना-राष्ट्रवादीतील फुटीनंतर राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी केली होती. आता पुन्हा राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष बनणार आहेत.

Share This

titwala-news

Advertisement