सर्व सरकारीकरण झालेल्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू करा – महाराष्ट्र मंदिर महासंघ.
मुंबई :- श्री सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाच्या वस्त्रसंहितेच्या निर्णयाचे महाराष्ट्र मंदिर महासंघाने स्वागत करत इतर सरकारीकरण झालेल्या मंदिरांतही ती लागू करण्याची मागणी केली आहे.
महासंघाने स्पष्ट केले की, वस्त्रसंहिता केवळ महिलांसाठी नसून सर्वांसाठीच आहे. देशातील अनेक प्रमुख मंदिरांमध्ये हा नियम आधीच लागू आहे. शाळा, न्यायालये, विधानभवन यांसारख्या ठिकाणी ड्रेसकोड असेल, तर मंदिरांमध्ये का नाही? असा सवाल करत, संस्कृतीच्या संरक्षणासाठी हा नियम आवश्यक आहे, असे महासंघाने सांगितले.