• Total Visitor ( 84442 )

फडणवीस पुन्हा येणार....

Raju Tapal March 04, 2023 68

फडणवीस पुन्हा येणार; पण पुढच्या मार्गाने की मागच्या दाराने, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांना चिमटा
कसब्यातील निवडणुकीत धनशक्ती आणि राजकीय ताकद पणाला लावूनही माविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा दणदणीत पराभव केला. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी २०२४ मध्ये ‘आम्ही पुन्हा येऊ’चा नारा लगावला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, “कसब्यात फडणवीस पुढच्या मार्गाने ते जिंकणार आहेत की मागच्या दाराने? हे त्यांनी स्पष्ट करावं. कसब्यात त्यांनी येण्याचे प्रयत्न केले, पण ते येऊ शकले नाहीत.” कसब्यातील निवडणुकीत गमावलेली जागा २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा जिंकण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांना संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस पुढच्या मार्गाने निवडून येणार आहेत की मागच्या? असा उपरोधिक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. पिंपरी-चिंचवडमधील माविआचा पराभव आपल्याला मान्य नसल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. आमच्यातीलच एक बंडखोर उभा करून मतविभागणी करण्यात भाजपला यश आहे. अन्यथा चिंचवडही कसब्याच्याच मार्गाने गेला असता, असा दावा राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले, “कालपासून त्यांना घाम फुटलाय. त्यामुळे इतर निवडणुका पुढे ढकलल्या जातील. त्यांची थोडीफार शिल्लक झोपही उडाली आहे. कसब्यात देवेंद्र फडणवीस पुढच्या मार्गाने ते जिंकणार आहेत की, मागच्या दाराने? कसब्यात त्यांनी येण्याचे प्रयत्न केले, पण ते येऊ शकले नाहीत. चिंचवडचा दरवाजा फक्त जगतापांमुळे उघडला गेला. ती त्यांची जागा आहे”.

Share This

titwala-news

Advertisement