• Total Visitor ( 702849 )
News photo

कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी कानगाव येथे शेतक-यांचे धरणे आंदोलन

Raju tapal September 29, 2025 162

कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी कानगाव येथे शेतक-यांचे धरणे आंदोलन        



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- कांद्याला ३५ रूपये हमीभाव मिळावा, संपूर्ण कर्जमूक्ती मिळावी, शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत या प्रमुख मागण्यांसाठी दौंड तालुक्यातील कानगाव येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

भानूदास शिंदे, नानासाहेब चौधरी, तुकाराम फडके,सयाजी मोरे,काका कोंडे,गणपत नलावडे, नामदेव फडके, भाऊसाहेब फडके, दादासाहेब गवळी, राजेंद्र गवळी, अनिल फडके,डाॅ.बापुराव फडके, सदाशिव चौधरी,मोहन धावडे, चंद्रकांत को-हाळे,गोरख को-हाळे, ज्ञानदेव गुंड, अनिल मोरे हे शेतकरी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनाचा शनिवारी ११ वा दिवस होता.शासन या आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे शेतक-यांनी आक्रमक होवून अंगावरील कपडे काढून ते कपडे जाळून शासनाचा जाहीर निषेध यावेळी केला.

       


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026