• Total Visitor ( 611187 )
News photo

एस टी ने दिलेल्या धडकेत कंपनी कामगाराचा मृत्यू

Raju Tapal publisher June 27, 2026 37

एस टी ने दिलेल्या धडकेत कंपनी कामगाराचा मृत्यू



फुलगाव‌ (गौतम पाटोळे):- एस टी ने दिलेल्या धडकेत कंपनी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सणसवाडी येथील एल अॅण्ड टी कंपनी फाट्यावर गुरूवार दि.२५ जूनला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. मारूती खंडू खेडकर वय -५९ वर्षं रा‌.माळीमळा तळेगाव ढमढेरे असे एस टी बसने समोरून दिलेल्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या कंपनी कामगाराचे नाव असून त्यांचे भाऊ शिवाजी खंडू खेडकर यांनी या घटनेची शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनूसार,तळेगाव ढमढेरे येथील माळी मळ्यातील मारूती खंडू खेडकर हे सहा महिन्यांपासून सणसवाडी येथील कंपनीत कामाला होते. सणसवाडी येथील एल अॅण्ड‌ टी फाट्यावर अहिल्यानगरवरून पुण्याला भरधाव जाणा-या एम एच २० जी सी ३७४८ क्रमांकाच्या एस टी बसने एम एच १२ इ एन ९०८१ या क्रमांकाच्या दुचाकीला समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील मारूती खंडू खेडकर यांच्या डोक्याला,हाता- पायाला गंभीर जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. एस टी बसचालक प्रतिक बबनराव पाटील रा‌.इस्लामपूर ता‌.वाळवा जि‌.सांगली याच्यावर शिक्रापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून शिक्रापूर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान,अपघातात मृत्यू झालेल्या मारूती खंडू खेडकर यांच्यावर तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथनगर स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement